कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

आरंभ व क्रोडा संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी

 आज शुक्रवार-दिनांक १२/०४/२०२४ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे आरंभ संस्था व क्रोडा इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता १ ली  ते ८ वी च्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारासंबंधी मोफत गोळ्या , औषधे  देण्यात आली. सुरुवातीस आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले.शेवटी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य ( क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल,फूटबॉल,कॅरम,बुद्धिबळ आदी ) वाटप करण्यात आले. नेत्र तपासणीत दोष आढळलेल्यांना नंतर मोफत चष्मेही वाटप करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन व आरोग्य तपासणी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक वृंद - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली तर्फे आरंभ संस्था तसेच क्रोडा इंडिया प्रा.लि. यांचे मन:पूर्वक आभार .

पुढील शैक्षणिक वर्षातही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा ….

धन्यवाद ..







No comments:

Post a Comment