निपुणोत्सव २०२४ ठाणे जिल्हा
कल्याण - रविवार दिनांक ३१ मार्च रोजी नरेंद्र कॉन्व्हेन्ट स्कूल, कल्याण,पूर्व येथे समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक ठाणे जिल्हा आयोजित निपुणोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा मानिवली शाळेने उत्तम सहभाग नोंदवला. यावेळी साक्षी शरद गायकर ताई व गीता दिलीप गायकर ताई यांनी खूप उत्कृष्ट सादरीकरण केले. आठवडा २८ दुसरा व्हिडिओ तसेच मुलांच्या प्रगतीसाठी अनेक बाबी त्यांनी आपल्या सादरीकरणात सांगितल्या. आणि याचेच यश म्हणजे कल्याण तालुक्यातील गोवेली केंद्राचा जिल्ह्यातून पहिला क्रमांक आला. यावेळी साक्षी ताई यांनी पालकांमधून जवळजवळ शंभर दीडशे च्या समूहात खूप छान आत्मविश्वासपूर्वक त्यांचे मत व्यक्त केले.
साक्षी शरद गायकर ताई व दिपा दिलीप गायकर ताई यांच्या मिळालेल्या सहकार्यासाठी या दोन्ही माता पालकांचे शाळेतर्फे मनस्वी आभार 🙏🙏🙏
No comments:
Post a Comment