लोकसहभागातून दिव्यांगांसाठी शौचालय
जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे अचिवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट च्या वतीने 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने शाळेला दिव्यांगांसाठी कॉलेजच्या वतीने शौचालय बांधून देण्यात आले. शौचालय बांधकामासाठी 5 गोणी सिमेंट गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. संजय भाऊ शेलार यांनी दिले तर इतर साहित्य व मजुरी कॉलेज च्या वतीने डॉ सी.ए. महेश भिवंडीकर सरांनी दिली.
विशेष म्हणजे कॅम्प कालावधी संपल्यानंतरही शौचालयाची रंगरंगोटी NSS कॅम्प च्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. या कामात त्यांना शालेय शिक्षिका सौ कोमल गायकर यांचे यजमान श्री उमेशभाऊ गायकर यांची साथ लाभली. श्री उमेश गायकर यांची शाळेला नेहमी मदत होत असते. शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते क्रीडा विषयही निःशुल्क शिकवत आहेत.
समाज व शाळा एकत्र आल्यास नक्कीच सकारात्मक वातावरण तयार होते व त्याचा परीणाम शाळा विकासावर व पर्यायाने गाव विकासावर होतो. यापुढेही हे संबंध असेच दृढ होतील यात शंका नाही. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सर्व दानशूर व शाळेस वेळ देणाऱ्या सन्माननीय दात्यांचे मनःपूर्वक आभार.
No comments:
Post a Comment