मानिवली शाळेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
मानिवली शाळेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
ठाणे - समग्र राष्ट्रीय शिक्षा राष्ट्रीय अविष्कार योजनेतर्गत ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभाग यांच्या अंतर्गत २२ ते २३ मार्च या दोन दिवशी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर, प्रतापगड, पुस्तकांचे गाव भिलार, वाबळेवाडी शाळा पुणे येथे या अभ्यास दौऱ्यादरम्यान भेटी देण्यात आल्या. यावेळी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद, महानगर पालिका नवी मुंबई, आश्रम शाळा यांतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, व दिव्यांग विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, विषयतज्ञ इत्यादी ७३ व्यक्तींचा समावेश होता. ह्यात जिल्हा परिषद शाळा मानिवली ह्या शाळेच्या चार विद्यार्थिनींचा व एका शिक्षीकेचा सहभाग होता. कु. यज्ञा जनार्दन भंडारी , कु. सेजल सुभाष कराळे , कु. मनाली सुभाष माळी , कु. पायल गणेश गायकर ह्या विद्यार्थिनींनी उत्तम प्रकारे सहभाग घेत या अभ्यास दौऱ्या दरम्यान प्रत्येक गोष्टीच्या नोंदी घेत आनंद घेतला. या दरम्यान भिलार गावातून पुस्तके वाचण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतली. वाबळेवाडी शाळेतून डिजिटल स्कूल, झिरो एनर्जी स्कूल, मुलांच्या सुप्त गुणांना चालनायुक्त वातावरणात मुले कशाप्रकारे आपल्या संकल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि शिक्षक त्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन देतात हे अभ्यासले. प्रतापगड पाहून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास अनुभवला.असे मत श्रीमती मंगल डोईफोडे (राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका) ह्यांनी ह्यावेळी वक्त केले.
No comments:
Post a Comment