कलामंदिर तर्फे शै साहित्य वाटप
नको दान पण प्रत्येकाला असावे मदतीचे भान
(शब्दांकन - श्रीमती मंगल गुणेश डोईफोडे)
असो ..
आज खरेतर खूप आनंदाचा दिवस.काही आपल्यांना भेटण्याचा योग..आणि त्यांनी म्हणजेच मयूर ,विभावरी ,तेजस यांनी माझ्या दुसरी तिसरी च्या मुलांना दिलेला एक मदतीचा हात माणुसकीला समृध्द बनवणारा आहे. खूप छान वाटते अशी माणसे आपल्या सोबत असली की.तिघांनीही खूप छान मार्गदर्शन मुलांना केले. भरतनाट्यम् पारंगत असणाऱ्या विभावरी ताईंनी तू चाल गड्या तुला रे इथे भीती कशाची या मराठी गाण्यावर खूप उत्कृष्ट नृत्य मुलांना करून दाखवले. आपल्या संस्कृतीची ओळख त्यांनी मुलांना प्रत्यक्षात करून दिली. त्यांचे थक्क करणारे सादरीकरण डोळ्यांच्या कडा पाणावून गेले.खूप धन्यवाद विभावरी ताई.धन्यवाद मयूर ,धन्यवाद तेजस.

मयूर विभावरी यांच्या कलामंदिर तर्फे आमच्या मुलांना जी शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली त्याबद्दल मुले खूप छान अभ्यास करणार अशी ग्वाही मुलांनी दिली.
नक्कीच शाळा हे आपले प्रथम मंदिर असावे यातील निरागस बालके हेच खरे ईश्वराचे रूप आहेत. प्रथम समाजाच्या ,देशाच्या विकासाचा प्रत्येक मूल हे पाया आहे ही जाणीव जेव्हा प्रत्येकाला असेल तेव्हा देश नक्कीच महासत्ता बनेल .
आमच्या शाळा विकास तसेच विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी मदत करणाऱ्या सर्व मदतदारांना आमचा मानाचा मुजरा...असेच अनेक हात पुढे सरसारावेत... आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत...
जिल्हा परिषद शाळा मानिवली.
जिल्हा परिषद शाळा मानिवली.
No comments:
Post a Comment