वार्षिक तपासणी
आज दिनांक 28/04/2023 रोजी आदरणीय विस्तार अधिकारी सौ.शोभना दळवी मॅडम यांनी पूर्वकल्पना देऊन आमच्या मानिवली शाळेस भेट दिली. प्रत्येक रेकॉर्ड चेक करत मॅडमांनी खूप छान मार्गदर्शन केले. हसत खेळत वार्षिक तपासणी झाली. संपूर्ण दिवस आज मॅडमांनी आमच्या शाळेत मानिवली शाळेची प्रगती समजून घेत सोबत घालवला. गप्पांच्या ओघातून मॅडम कळतनकळत छान मार्गदर्शन ही करत होत्या तसेच आम्हा शिक्षकांवर प्रोत्साहन पर शाबासकीची शाब्दिक थाप देत खूप गोड कौतुक ही करत होत्या. मॅडम आपण आमच्या कामाची दाखल घेतली याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद.🙏 स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. तसेच चौधरी सरांनी ऑनलाईन प्रगती पुस्तकं बनवले त्याचेही कौतुक केले. विज्ञान विषयात मुले पुढे जात आहेत याबद्दल विज्ञान विषय घेणाऱ्या पूजा मॅडम यांचे ही कौतुक केले. एकंदरीत शाळेचे व शिक्षकांचे कामकाज याविषयी समाधान व्यक्त केले.धन्यवाद मॅडम🙏 तसेच रेकॉर्ड कसे अद्ययावत ठेवता येईल यासाठी पुढील वर्षी अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले .
मॅडम आजच्या आपल्या आनंददायी भेटीसाठी मानिवलीतील सर्व शिक्षकांकडून आपले मनापासून धन्यवाद 🙏
Labels:
घडामोडी
No comments:
Post a Comment