शाळा पूर्वतयारी मेळावा 1
आज दिनांक 27-4-2023 रोजी आपल्या जिल्हा परिषद शाळा, मानिवली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. जुन 2023 पासून इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी, शारीरिक व बौद्धिक विकास, भाषा विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी तसेच पालकांना शाळा पूर्व तयारी साहित्य वाटप असे वेगवेगळे स्टॉल लावून विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक क्षमता तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पावलाचे ठसे कागदावर उमटवून विद्यार्थ्यांनी शाळेत पहिलं पाऊल टाकलं. पुष्पगुच्छ, शिरा, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. मुलांसाठी छान सेल्फी पॉइंट तयार करून त्यात प्रत्येक विद्यार्थी व पालकांचे फोटो काढले. त्यानंतर प्रत्येक स्टॉल वर जाऊन विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता तपासणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment