कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

कारुण्या ट्रस्ट फुलवणार जिल्हा परिषद शाळा मानिवलीची परसबाग

आज शुक्रवार दिनांक ६\१\२०२३रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे  मानिवली ग्रामपंचायती चे उपसरपंच आदरणीय श्री चंद्रकांत गायकर ह्यांनी कारूण्या ट्रस्ट कल्याण मार्फत शाळेतील परसबाग फुलवण्याचे निश्चित केले 

कारूण्या ट्रस्ट चे श्री.सतीश ठाकरे श्री.सदाशिव वाघचौडे सौ.साधना बुटेरे तसेच सौ.नम्रता देवकर ह्यांनी प्रत्यक्ष परसबागेच्या जागेची पाहणी करून उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले 

नैसर्गिक सेंद्रिय पध्दतीने बागेत भाजीपाल्याची लागवड कशाप्रकारे केली जाईल तसेच त्यांना लागणारे सर्व खत हे नैसर्गिक पद्धतीने शाळेतच कसे तयार करता येईल ह्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले 

पुढच्या भेटीत शाळेची प्रत्यक्ष परसबाग तयार करून खत तयार करण्याचा डेमो सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी वर्गांना दाखवण्याचा मानस कारूण्या ट्रस्ट च्या टीमने व्यक्त केला 

त्याबद्दल आमची जि.प.उच्च प्राथमिक शाळा मानिवली कारूण्या ट्रस्ट कल्याण  चे मनःपूर्वक आभार मानते 

धन्यवाद 🙏





No comments:

Post a Comment