क्षेत्रभेट - जलशुद्धीकरण केंद्र
जलशुद्धीकरण केंद्रास दिली जिल्हा परिषद शाळा मानिवली च्या विद्यार्थ्यांनी भेट
मोहिली , दिनांक 24 डिसेंबर 2022 -रोजी आपल्या जिल्हा परिषद शाळा, मानिवली या शाळेतील शिक्षक व इयत्ता 5वी व 6वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी गावापासून जवळच असलेल्या मोहीली जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली.
तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम जलशुद्धीकरण केंद्राचे कर्मचारी श्री मनोज गोंधळी यांनी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कसे शुद्ध केले जाते. त्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात हे सर्व प्रत्यक्ष दाखवले. तसेच त्याबाबत संपूर्ण माहिती दिली. सर्व बघून झाल्यानंतर मुलांच्या मनात अनेक प्रश्न होते. मुलांनी इंजिनीअर श्री गौतम गायकवाड सरांची मुलाखत घेतली आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन केले. गौतम सरांनी सुद्धा खूप सहकार्य केले त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.
Labels:
शालेय उपक्रम
No comments:
Post a Comment