प्रेम_अंश संस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप
दि.13/8/22 रोजी जि. प. शाळा मानिवली येथे 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रेम अंश बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुषमा मॅडम , मा. एकनाथ पाटील, मा. रमेश काठे, मा. जगदीश गुंजाळ , मा. बनसोडे , मा. ऋषीकेश शिरोडे ,छोटा पाहुणा समर्था आदी मान्यवरांनी शाळेस भेट दिली.
सर्वप्रथम शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत मुलांनी बनविलेले पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील मुलांनी देशभक्तीपर समूहगीते सादर केली. सुषमा मॅडम यांनी सुद्धा छानसे गीत म्हणून दाखविले.त्यानंतर आलेल्या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांना मार्गदर्शन केले.या संस्थेमार्फत शाळेतील मुलांना खाऊ (बिस्कीट पुडे )वाटप करण्यात आले.तसेच मा. एकनाथ दादा पाटील यांच्या वतीने 44चौकटी वह्या,167 एकरेघी वह्या,167 दुरेघी वह्या यांचे वाटप करण्यात आले. माननीय रमेश काठे यांच्या मार्फत शाळेला 6 वॉटर जार संस्थेने भेट दिले.शेवटी शाळेच्या वतीने संस्थेचे आभार मानून योगदान सन्मानपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment