स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ध्वजारोहण दिवस १
हर घर तिरंगा _हर मन तिरंगा
शनिवार दिनांक १३\८\२०२२रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा 'तसेच स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमात मानिवली ग्रामपंचायती चे उपसरपंच सन्माननीय चंद्रकांत (दादा)गायकर,ग्रामपंचायत सदस्या सुकन्याताई गायकर,शा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा शाळा सुधार समिती चे अध्यक्ष दशरथ गायकर ज्योतीताई गायकर,किर्तीताई गायकर,सरिता भंडारी प्रतिक्षा गायकर व इतर सदस्य सर्व विद्यार्थी व शिक्षक वॄंद उपस्थित होते
सकाळी ठीक ८/३०वाजता शा.व्यवस्थापन समितीच्या सभेत ठरल्या प्रमाणे मानिवली ग्रामपंचायती चे उपसरपंच तथा कार्यक्रमाचे अधयक्ष सन्माननीय चंद्रकांत (दादा) गायकर ह्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले
ह्या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच भाषणं सादर केली
अधयक्षीय भाषणात चंद्रकांत दादांनी शाळेच्या समस्या व उपाय ह्यावर आपले मनोगत व्यक्त केले . मनोगतात त्यांनी सर्व सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही हे सांगुन देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली त्यानिमित्ताने शाळेला स्वत: वैयक्तिक ७५०००/रुपये (पंचाहत्तर हजार रुपये) शाळा सुधार देणगी देण्याची घोषणा केली . ह्या देणगीतून शाळेचा सर्वांगीण विकास व शाळेचा विकास घडून येईल ह्यात तिळमात्र शंका नाही.
आज आपण बघतो बरेच दानशूर आपली देणगी आपल्या प्रसिद्धी साठी देत असतात ......परंतु खरेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भुक भागविण्यासाठी व खरा परमार्थ साधण्यासाठी मानिवली ग्रामपंचायती चे उपसरपंच सन्माननीय श्री चंद्रकांत दादा हयांनी त्यांची वैयक्तिक ७५०००/रूपयांची देणगी लाखमोलाची व समाजापुढे एक आदर्श निर्माण करेल.
अशा निस्वार्थी दात्यास (चंद्रकांत दादा)आमची जि.प.शाळा मानिवली, शिक्षक वृंद व समस्त विद्यार्थीवर्ग ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ वेळा सलाम करते
धन्यवाद 🙏
शिक्षक वृंद शाळा मानिवली ता.कल्याण
No comments:
Post a Comment