कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे ध्वजारोहण सोहळा

आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सुहास डांगळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वेळेस नारळ फोडण्याचा मान श्री. लक्ष्मण भाऊ गायकर ह्यांना देण्यात आला. शालेय आवारात परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतही पुढे जावेत यासाठी क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आपल्या मनोगतात उपसरपंच श्री चंद्रकांत दादा गायकर यांनी शाळेच्या विकासात विविध संस्थांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली तसेच यापुढील काळात देखील शाळेस आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी विविध संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यांनी स्वतः स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त शाळेस ७५००० रुपयांची देणगी जाहीर केली. परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुहास डांगळे सर यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या विकासात प्रतिष्ठान चे सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल ह्याची ग्वाही दिली. वेळ पडल्यास प्रसंगी मंत्रालयामार्फत सुद्धा मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका व कार्यक्रमाच्या सूत्र संचालिका श्रीमती मंगल डोईफोडे मॅडम यांनी परिवर्तन प्रतिष्ठानने शाळेच्या विद्यार्थ्यांची यापूर्वीही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करून घेतली होती असे गौरवोद्गार काढले.

या प्रसंगी परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुहास डांगळे सर , उपाध्यक्ष श्री. किरण प्रधान सर, संपूर्ण परिवर्तन प्रतिष्ठान ची टीम ,  ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मायाताई गायकर , उपसरपंच श्री. चंद्रकांत दादा गायकर , ग्रामसेविका सौ स्वाती शेलार मॅडम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. साक्षीताई गायकर , उपाध्यक्ष श्री. दशरथभाऊ गायकर , नागोटकर सिस्टर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मयेकर मॅडम , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रगणे सर ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या वतीने कृतज्ञता म्हणून परिवर्तन प्रतिष्ठान ला योगदान सन्मानपत्र देण्यात आले. 

शेवटी प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

परिवर्तन प्रतिष्ठानचे प्रवक्ते श्री श्रीपाद आवटे सरांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. ते खालीलप्रमाणे पार पडले. 

*क्रीडासाहित्य वाटप कार्यक्रम रूपरेषा* 

*टोटल -  क्रीडासाहित्य* 

कॅरम - १

बॅट - २

चेस - ३

स्कीपपिंग - २

स्कीपपिंग दोरी उड्या - १२

फुटबॉल - ४

स्विंग डिश - ५

बॅडमिंटन रॅकेट - २ 

रिंग - २

कंबर रिंग - ३

टेनिस बॉल - ५

बॅडमिंटन कोक बॉक्स - १

प्लास्टिक बॉल बॉक्स - १

*वाटप हे पुढील क्रमाने झाले :*

१) श्री. सुहास प्र. डांगळे - परिवर्तन प्रतिष्ठान - अध्यक्ष  -  कॅरम - १ / बॅट - १ / बुद्धिबळ - १

२) श्री. किरण प्रधान - परिवर्तन प्रतिष्ठान - उपाध्यक्ष  - बॅट -१ / बुद्धिबळ - १ / फ़ुटबाँल - १ 

३) श्री. गणेश पेडामकर - प्रमुख सल्लागार  - बुद्धिबळ - १ / फुटबॉल - १ / बॅडमिंटन रॅकेट - १

४) श्री. हितेश कुंभार - मुलुंड विभाग प्रमुख - फुटबॉल - १ / बॅडमिंटन रॅकेट - १ 

५) श्री. श्रीपाद आवटे - प्रवक्ता - फुटबॉल - १ / टेनिस बॉल - ५ 

-------------------------------------

विभाग प्रमुख : 

६) ओंकार कोचरेकर - डोंबिवली विभाग प्रमुख  - स्कीपपिंग - १ / बॅडमिंटन कोक बॉक्स - १

७) सुधीर महाजन  - भांडुप विभाग प्रमुख - स्कीपपिंग - १ / प्लास्टिक बॉल बॉक्स - १

८) विजुभाऊ  - उल्हासनगर सदस्य  - स्विंग डिश - १ / कंबर रिंग - १

९) दुर्गेश  - कल्याण विभाग प्रमुख  - स्विंग डिश - १ / कंबर रिंग - १

१०) राहुल पिंगळे  - कल्याण पूर्व विभाग प्रमुख  - स्विंग डिश - १ / कंबर रिंग - १

११) अजित कांबळे  - मुलुंड पूर्व - जनसंपर्क विभाग प्रमुख  - स्विंग डिश - १ / रिंग - १

१२) दिनेश वाघ  - सहकारी - घाटकोपर पूर्व विभाग प्रमुख - स्विंग डिश - १ / रिंग - १

*शालेय मान्यवरांतर्फे - स्कीपपिंग दोरी उड्या - १२*

 - याव्यतिरिक्त वेशभूषा व कला सादर जाणाऱ्या मुलांना उत्तेजनार्थ बक्षिसे पण देण्यात आली.

*परिवर्तन प्रतिष्ठानच्या ह्या भगीरथ कार्यासाठी जिल्हा परिषद मानिवली च्या वतीने मनापासून आभार.*


- शब्दांकन 

श्री. नंदू भिमराव चौधरी

प्राथमिक शिक्षक

जिल्हा परिषद शाळा मानिवली

7588176456









No comments:

Post a Comment