ध्वजारोहण सोहळा
स्वातंत्र्य दिनाच्या
सर्वांना अनेक शुभेच्छा🇮🇳🎉🌹
दिनांक १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे स्वातंत्र्य दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय , आरोग्य कार्यालय ,अंगणवाडी कार्यालय येथील ध्वजारोहण संपन्न होत प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात आली. गावातील प्रथम नागरिक म्हणून आदरणीय सरपंच मायाताई गायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी इयत्ता सातवी आठवी च्या मुलांनी डोळ्यात पाणी आणले ,अंगावर शहारे आणले इतके सुंदर लेझिम नृत्य केले. यानंतर वरुण राजाला विनवणी करत शाळेच्या प्रांगणातच रिमझिम सरी झेलत तरीही अतिशय उत्कृष्ट भाषणे , समूह गीत , नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. शीतल पाटील यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत या मंगल प्रसंगी गाऊन सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकांचे स्मरण करून दिले. खरच लता दीदीं त्यांच्या आवाजातील ही अनमोल देणगी आपल्याला देऊन गेल्या. आदरणीय सरपंच मायाताई गायकर ,उपसरपंच चंद्रकांत दादा गायकर ,पोलीस पाटील दादा , ग्रामसेविका ताई ,नवोदय ला गेलेली किंजल बजागे तिचे पालक कमलाकर बजागे ,राकेश भाऊ यांचा सत्कार यावेळी शाळेमार्फत करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. वेशभूषा स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी शाळेतर्फे व भाषण यातील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तर्फे बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना श्री.जगदीश गायकर सदस्य यांचे कडून चॉकलेट्स , श्री.दशरथ गायकर यांचे कडून केळी वाटप करण्यात आले. स्वाध्यायपरिवाराचे युवकांनी अतिशय सुंदर संदेश देणारे पथनाट्य या प्रसंगी सादर केले. उपस्थितांनी कार्यक्रमाच्या सुरुवाती पासून ते समारोप होई पर्यंत खूप छान सहकार्य दिले. शाळेतील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून घेत असलेल्या अथक परिश्रमाला ग्रामपंचायत, ग्रामस्थ , शालाव्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य ,पालक ,विद्यार्थी यांची उत्तम साथ मिळाली.
सर्वांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
🇮🇳जय हिंद🇮🇳
टीम मानिवली.✊🇮🇳
No comments:
Post a Comment