कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

मानिवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मानिवली दिनांक 30 जुलै 2022
 जि प शाळा मानिवली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने जमा केलेल्या शैक्षणिक व उपयोगी वस्तू गाळेगाव, मोहने येथील आश्रमला भेट देऊन मुलांना वाटप करण्यात आल्या , तसेच याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षिका मंगल डोईफोडे , आरंभ संस्थेच्या संगणक / सायन्स लॅब शिक्षिका पूजा माळी, आरंभ संस्थेचे project co-ordinator संदेश गायकर देखील या उपक्रमात सहभागी झाले. तसेच विद्यार्थ्यां तर्फे शैक्षणिक वस्तू - पेन्सिल, रबर, वही, पेन, पट्टी, दोरी उडी, पूजा माळी यांच्यातर्फे 5 किलो तांदूळ ,30 आंघोळीचे साबण, 10 कोलगेट , आरंभ संस्थेतर्फे सीलिंग फॅन , मीहिका फार्महाऊस मानिवली यांच्यातर्फे 100 शालेय वह्या आश्रमातील मुलांसाठी वाटप करण्यात आल्या.
यावेळी मुलांशी जनरल नॉलेज विषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या मुलांनाही बक्षिसांचे वाटप करण्यात आले. खेळी मेळीच्या  वातावरणात मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला.
 शाळेतील विद्यार्थ्यांनीही आजच्या त्यांना मिळालेल्या अनुभवाचा आनंदात प्रतिसाद नोंदवला.


 











No comments:

Post a Comment