किशोरवयीन मुलींचा मेळावा संपन्न - सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
मानिवली , दिनांक 28 जुलै 2022
आज जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई सौ.माया गायकर ह्या उपस्थित होत्या. डोंबिवली चे संजय ठाकूर देसाई व अपर्णा ठाकूर देसाई या जोडप्याने स्वखर्चाने मुलींनी सॅनिटरी नॅपकिन चे वाटप केले तसेच मार्गदर्शन केले . मुलींना आरोग्य , आहार , मासिक पाळी याचे मार्गदर्शन माया ताई यांनी केले ,मुलींनी विचारलेल्या काही शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच ह्या भेटीत त्यांनी जुने पाणी कनेक्शन पुर्ववत करून देऊ असे आश्वासन दिले .यावेळी मुलींनी खूप छान फुलांची रांगोळी काढली तसेच स्वतः बनवलेले बुके पाहुण्यांना त्यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले.
No comments:
Post a Comment