कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

आणि पाणी समस्या सुटली...

 उपसरपंच श्री. चंद्रकांत बाळाराम गायकर यांच्या दातृत्वाने जिल्हा परिषद शाळा मानिवली ची पाणी समस्या  मिटली...

मानिवली , दिनांक २८/०७/२०२२

जिल्हा परिषद शाळा मानिवली येथील पाणीपुरवठा नदीची पाणीपातळी वाढल्याने ठप्प होता. शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी सुद्धा पाणी नव्हते अशी बिकट परिस्थिती असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावचे उपसरपंच श्री. चंद्रकांत दादा बाळाराम गायकर यांनी रिक्षा चालक श्री. अनंता गायकर यांच्या मदतीने मोहिली ते शाळा पाणी आणण्याची जबाबदारी उचलली. पाणी वाहतुकीच्या खर्च स्वतः उपसरपंच श्री. चंद्रकांत दादा गायकर यांनी उचलला. या प्रसंगी त्यांनी त्यांचे यापुढील उपसरपंच पदाचे मानधन देखील शाळेस दान देण्याचे सांगून तसे  शपथपत्रच त्यांनी शाळेस दिले.  जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व अशा दातृत्ववान लोकप्रतिनिधींमुळेच टिकून आहे. त्यांच्या या दातृत्वाला जिल्हा परिषद शाळा मानिवलीच्या वतीने शतशः आभार.


No comments:

Post a Comment