शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न
SMC MEETING HELD
आज बुधवार दिनांक 20/7/2022 रोजी जि.प.शाळा मानिवली येथे शा.व्यवस्थापन समितीची दुसरी सभा संपन्न झाली
सभेत ग्रामपंचायती चे उपसरपंच सन्माननीय श्री.चंद्रकांत (दादा)गायकर शा.व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.साक्षी गायकर व इतर सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते
सुरवातीला च सन्माननीय चंद्रकांत दादांच्या सहकार्याने आपल्या शाळेला सौ.कोमल उमेश गायकर ह्यांच्या रुपाने जे मानधन मिळेल ते मान्य या तत्वावर शिक्षक मिळवून दिला
खरोखर ह्या कामाबद्दल चंद्रकांत दादांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण त्यांचे उपसरपंच पदाचे मानधन पण ते शाळेला देतात शिवाय शाळेच्या जे काही समस्या असतील त्या कशा मार्गी लागतील ह्यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात
सभेमध्ये पुढील विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली
1)पाणी प्रश्न 2)झेंडा वंदन 3)CSR जमा करणे बाबत 4)शा.पो.आहार 5)मंथन प्रज्ञाशोध परीक्षेबाबत 6)शै.उठावाबाबत 7)आयत्या वेळी येणारे विषय
शेवटी उपस्थित पदाधिकारी अधयक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे प्रगणे सरांनी शाळेच्या वतीने आभार मानून अधयक्षांच्या वतीने सभेची सांगता करण्यात आली🙏
धन्यवाद
शिक्षक वृंद मानिवली
No comments:
Post a Comment