कल्याण पंचायत समिती सभापती सौ.रेश्माताई भोईर यांची शाळेस भेट
मानिवली,
दिनांक 22 जून 2022
💐आज रोजी आमच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे दुपारी 12/30वाजता कल्याण पं.समिती सभापती सन्माननीय सौ.रेश्माताई भोईर मॅडम ह्यांनी अचानक शाळेला भेट दिली भेटीदरम्यान शालेय पोषण आहार,गणवेश निधी,इंधन बील,स्वंयपाकीण ताई व मदतनीस ह्यांचे मानधन ह्याबाबतीत चौकशी करून शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मिळणारे धान्य धान्यादी माल हा वजन करूनच घ्यावा असे सांगितले
त्याचप्रमाणे शाळेतील समस्या,अडचणी आस्थेने जाणून घेतल्या इ.1ली ते 8वी चे वर्ग व शिक्षक केवळ 4 (पटसंख्या 172),शिक्षक मागणी,लाईट बील,स्वंयपाकीण ताई व मदतनीस ह्यांचे मानधन मिळाले नाही,नवीन वर्गखोली मागणी इ.समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पं.समितीला मागणी पत्र द्यावे अशी मुख्याध्यापिका मॅडम ना सुचना केली.
खरोखरच एवढ्या मोठ्या पदाधिकारी असून सुध्दा आमच्या शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या,शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या नुसत्या जाणून न घेता त्याचा पाठपुरावा करून लवकरच सोडवू अशा सांगणारया सन्माननीय सभापती मॅडम आपल्या शाळेसाठी , तालुक्यासाठी एक आदर्शच आहेत धन्यवाद मॅडम 🙏
या प्रसंगी मानिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मा. मायाताई गायकर, ग्रामपंचायत सदस्य मा. योगेश भाऊ गायकर , मानिवली शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
🙏🏻
शब्दांकन - श्री. विजय प्रगणे
उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा मानिवली
No comments:
Post a Comment