कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, कल्याण च्या वतीने मानिवलीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

आदिवासी वाडीतील महिलांना स्वच्छता किट चे वाटप

मानिवली
दिनांक 8 मार्च 2022


मानिवली गावातील आदिवासी वस्तीत अचीव्हर्स कॉलेज च्या NSS टीम च्या वतीने  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कॉलेजचे चेअरमन आदरणीय डॉ. महेश भिवंडीकर सर ,प्राचार्या सोफिया डिसूजा मॅडम ,उप प्राचार्या सना खान मॅडम, WDC समन्वयक सिद्धि चव्हाण मॅडम, एनएसएस कार्यक्रम अधिकारी राजेश यादव सर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी कॉलेजच्या वतीने आदिवासी वाडीतील महिलांना स्वच्छता किट वाटप करण्यात आले. कॉलेजच्या सर्व महिला स्टाफने बालकांना अगदी ममतेने खाऊ वाटप केला. पेशाने सी. ए. असलेले डॉ. भिवंडीकर सर वाडीतील बालकांमध्ये अगदी लहान बालक  होऊन खेळत होते.  

या प्रसंगी वाडीला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळा मानिवली ला देखील चेअरमन सरांनी आवर्जून भेट देऊन क्रोडा आणि आरंभ संस्थेच्या CSR निधीतून शाळेची भौतिक प्रगती पाहून   कौतुक केले.  समाजातील वंचित घटकातील बालकांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह धरत सरांनी या प्रसंगी शाळेस आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक स्पॉन्सर करण्याचा शब्द दिला. महिला दिनाची व्याप्ती फक्त महिलांपुरतीच न ठेवता महिलांच्या बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल इथपर्यंत आणून ठेवली ,ही कॉलेजची दृष्टी खरंच आजच्या समाजाला दिशादर्शक अशीच आहे. 

भविष्यात देखील शाळा आणि कॉलेज यांच्या समन्वयाने असे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस या प्रसंगी चेअरमन साहेबांनी व्यक्त केला.  शेवटी शाळेच्या वतीने शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. विजय प्रगणे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


---✍️ श्री. नंदू बी. चौधरी , प्रा.शिक्षक 

जिल्हा परिषद शाळा मानिवली







No comments:

Post a Comment