कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

12 ते 14 वर्षे वयोगट लसीकरण

 12 ते 14 वर्षे वयोगट लसीकरणास पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

मानिवली , 17 मार्च 2022

    आज जिल्हा परिषद शाळा मानिवली व आरोग्य उपकेंद्र मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मानिवली आवारात वय वर्षे 12 ते 14 मधील विद्यार्थ्यांना  CorBEvax ही लस देण्यात आली. इयत्ता ७ वी तील विद्यार्थी कु. आर्यन भाऊ गायकर ह्याला पहिली लस देण्यात आली.  एकूण  ६३  विद्यार्थ्यांपैकी आज  ३६ विद्यार्थ्यांनी लस घेतली.  विशेष म्हणजे आदिवासी पालकांनी देखील समज दाखवून आपल्या पाल्यांना लस दिली. काही खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील याचा लाभ घेतला.
    सर्वप्रथम डॉक्टर सायली जाधव यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करून त्यांना लसीकरणास तयार केले. यावेळी नर्स सौ  पूजा बने, सौ . नम्रता गायकर , आशाताई सौ. गायकर, मदतनीस कांताबाई मगर , ग्रामपंचायत शिपाई श्री. सुरेश भाऊ गायकर , शिक्षक श्री. नंदू चौधरी , सौ. पूजा वारघडे  मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. 
आज रोजी शाळेच्या १२ ते १४ वयोगटातील ५७ %  विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. येत्या कॅम्पमध्ये १००% विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. 
पहिला लाभार्थी - कु. आर्यन भाऊ गायकर व लसीकरण स्टाफ

आदिवासी पालकांचे प्रबोधन करताना चौधरी सर





No comments:

Post a Comment