ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे साहेब यांच्या हस्ते मानिवली शाळेच्या विद्यार्थिनींचा गौरव – NMMS परीक्षेत ग्रामीण गुणवत्तेचा नवा आदर्श
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे साहेब यांच्या हस्ते मानिवली शाळेच्या विद्यार्थिनींचा गौरव – NMMS परीक्षेत ग्रामीण गुणवत्तेचा नवा आदर्श
दि. ९ एप्रिल २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यातील बी. जे. हायस्कूल सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात पीएम श्री जिल्हा परिषद शाळा, मानिवली (तालुका कल्याण) येथील पाच विद्यार्थिनींनी NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ठसा उमठवला आहे.
शहापूर तालुक्याचे स्पर्धा परीक्षांमधील वर्चस्व अधोरेखित झाले असले, तरी कल्याण तालुक्यातील मानिवली शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता दाखवत "आम्हीही मागे नाही" हे सिद्ध केले आहे.
या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री नंदू भिमराव चौधरी सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment