कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

मानिवली शाळेच्या विद्यार्थिनींची जिल्हा परिषद, ठाणे कार्यालयास प्रेरणादायी भेट – प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख

 PM श्री जिल्हा परिषद शाळा, मानिवली (तालुका कल्याण) येथील NMMS परीक्षेत यश मिळवलेल्या पाच विद्यार्थिनींची ठाणे जिल्हा परिषद कार्यालयास प्रेरणादायी exposure visit आयोजित करण्यात आली. ही भेट मानिवली शाळेचे वर्गशिक्षक श्री नंदू भिमराव चौधरी सर यांनी विशेष प्रयत्न करून घडवून आणली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद कार्यालयाची कार्यपद्धती आणि एकूण सोळा विभागांची थेट ओळख करून देण्यात आली. प्रत्येक विभागाचे कार्य, जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय शिस्त याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या प्रसंगी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे साहेब यांचे स्वीय सहायक श्री चौरे सर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधत स्पर्धा परीक्षांची तयारी, वाचनाची सवय आणि स्वप्न मोठी ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. प्रोत्साहन म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीला पुस्तक सस्नेह भेट दिले.

विशेषतः माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांची प्रशासकीय केबिन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. त्या क्षणी विद्यार्थिनींच्या डोळ्यांत उत्सुकता आणि आत्मविश्वास दिसत होता. त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय सेवांचा अनुभव घेता आला आणि भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे काय, याची पहिली जाणीव झाली.

या भेटीमुळे विद्यार्थिनी प्रेरित झाल्या असून त्यांनी पुढील वाटचालीसाठी नव्या जोमाने तयारी करण्याचा संकल्प केला.  

वर्गशिक्षक श्री नंदू चौधरी सर यांच्या प्रयत्नातून झालेली ही भेट मानिवली शाळेच्या विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे.













No comments:

Post a Comment