प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज दिनांक २६ जानेवारी२०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.याप्रसंगी सर्व पालक वर्ग, सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामसेविका मॅडम , पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
आचारसंहिता असल्याने ध्वजारोहण मुख्याध्यापिका श्रीमती मयेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या प्रथम नागरिक सौ सुकन्याताई दशरथ गायकर यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आजच्याच दिवशी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री संजयभाऊ शेलार यांचा वाढदिवस असल्याने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. तसेच विविध शालेय तसेच आंतरशालेय परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स, पॅड, पेन , स्केचपेन बॉक्स आदींचे वाटप केले.
उपसरपंच श्री चंद्रकांत दादा गायकर यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या भावी प्रगतीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या तसेच उपस्थितांना शाळेच्या fire audit साठी आवश्यक बाबींसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला नेहमीप्रमाणे तात्काळ प्रतिसाद देत श्री संजयभाऊ शेलार व श्री निलेशभाऊ शेलार यांनी शाळेस ५००० रु शाळेस fire extinguisher घेण्यासाठी दिले. खरंच असं दातृत्व क्वचितच शाळांना लाभते. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचे खूप खुप आभार.
यानंतर विद्यार्थ्यांचे भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी श्री संजयभाऊ शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment