कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

मुलांना शाळेत पाठवताय...पालकांनो आधी हे बघा...

पालकांना सूचना....

आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याआधी खालील मुद्दे लक्षात घ्या.

१. आपल्या पाल्यास कोविड अपेक्षित व्यवहार (covid appropriate behaviour) बद्दल सांगा. उदाहरणार्थ - मास्क परिधान करणे,सामाजिक अंतर राखणे, ठराविक कालावधीने हात धुत राहणे वगैरे..
२. पुरेसे मास्क तयार करणे व सदर मास्क दररोज धुणे,
३. मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवणे.
४. लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे,
५. मुलांना कमीत कमी पुस्तके /वहया न्याव्या लागतील अशी व्यवस्था असावी. 

घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी :

१. घरात आल्यानंतर थेट स्नानगृहामध्ये जाणे,
२. स्नान करुन युनिफॉर्म बदलणे,
३. आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा (विद्यार्थ्याने युनिफॉर्म घातलाच पाहिजे असा शाळेचा कुठलाही आग्रह नाही)
४. मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा,
५. पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करुन त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावे.

पोपटराव पवार काय सांगत आहेत बघा ..

हिवरे बाजार गावातील शाळा ग्रामपंचायतीच्या नियोजनाने कशा चालू केल्या व पालकांना काय सूचना केल्या हे खालील व्हिडीओ ला क्लीक करून आवर्जून बघा...(१५ मिनिटं आपण आपल्या पाल्यासाठी काढा आणि ऐका)

No comments:

Post a Comment