डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली – महापरिनिर्वाण दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापक श्री. विजय प्रगणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पणाने झाली. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, पालक, व गावकऱ्यांनी अभिवादन केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीत गायले, तर काहींनी भाषणे दिली. कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांच्या कार्याची महती पटवून दिली गेली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नंदू चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मंगल डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेबाबत जागरूकता निर्माण झाली.
No comments:
Post a Comment