वर्तमानपत्र वाचनावर आधारित साप्ताहिक प्रश्नमंजुषा स्पर्धा - इयत्ता आठवी**
दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचनावर आधारित साप्ताहिक प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या उपक्रमाचे आयोजन आणि कल्पना इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक श्री नंदू चौधरी सर यांनी केले. चौधरी सरांनी आठवडाभर दररोज विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचण्यासाठी दिले आणि त्यावर आधारित चालू घडामोडींवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली.
स्पर्धेमध्ये एकूण पाच गट तयार करण्यात आले होते. चौथा गट विजयी ठरला. विद्यार्थ्यांनी अत्यंत जोशात आणि तल्लख बुद्धीने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय प्रगणे सर उपस्थित होते.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये खालील महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते:
1. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी कोणत्या गँगने स्वीकारली? - **बिश्नोई गँग**
2. मुंबईत कोणत्या वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे? - **हलकी वाहने, एसटी बसेस, स्कूल बस, कार**
3. कोणत्या मराठी ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले? - **अतुल परचुरे**
4. महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदान कोणत्या दिवशी होणार आहे? - **20 नोव्हेंबर 2024**
5. न्यायदेवतेच्या मूर्तीत नुकतेच केलेले बदल कोणते? - **डोळ्यावरील पट्टी काढली, हातात तलवार ऐवजी संविधान**
6. बांगलादेशातील नागरिक कोणत्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत? - **आसाम**
7. विवान कपूर आणि अनंतजीत नारुगा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? - **नेमबाजी**
8. श्रद्धा पडवेकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? - **बुद्धिबळ**
9. T20 आशिया चषक स्पर्धेत भारताच्या संघाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आले आहे? - **तिलक वर्मा**
10. 10 मीटर एअर रायफल विश्वचषक नेमबाजीत रोप्य पदक कोणी पटकावले? - **सोनम मस्कर**
11. 50 मीटर रायफल तीन पोझिशन विश्वचषक नेमबाजीत कांस्यपदक कोणी पटकावले? - **अखिल शिओरन**
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे चालू घडामोडींचे ज्ञान वाढले तसेच वर्तमानपत्र वाचनाची आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांचा सहभाग, जिज्ञासा आणि उत्तम कामगिरी यामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण होते.
**- मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, मानिवली**
![]() |
विजेता गट |
No comments:
Post a Comment