वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा मानिवली येथे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून त्या-त्या राज्यांचे प्रतिनिधित्व केले. तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांच्या वेशभूषांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केले.
स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या सौ पूजा माळी आणि सौ मंगल डोईफोडे या शिक्षिकांनी पार पडले. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री संजय भाऊ गायकर उपस्थित होते. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शंभर रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले. तसेच आठवीच्या वर्गशिक्षक श्री चौधरी सर यांनीही पन्नास रुपयांचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय प्रगने सर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संस्कृतीविषयक ज्ञानात आणि आत्मविश्वासात वाढ झाली. स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे शाळेत आनंदाचे वातावरण होते.
**- मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, मानिवली**
No comments:
Post a Comment