महिला संगणक साक्षरता वर्ग सुरु
महिला संगणक साक्षरता वर्ग सुरु
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे महिला पालकांसाठी क्रोडा केमिकल्स कंपनीतर्फे संगणक वर्ग सुरु करण्यात आले आहेत. लॉकडाउन असल्याने शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्याने शाळेतील संगणक वर्ग बंद होते . त्यांचा सदुपयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हावा या उद्देशाने शाळेतील संगणक कक्ष महिला पालकांसाठी खुला करण्यात आला.पहिल्या टप्प्यात १५ महिला संगणक साक्षर होत आहेत. गावातील तरुण संगणक शिक्षक संदेश गायकर हे मार्गदर्शन करीत आहेत.
No comments:
Post a Comment