स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
मानिवली शाळेने जवानाच्या हस्ते ध्वजारोहण करत समस्त ग्रामस्थ ,विद्यार्थी व समाजाला दिला नवा संदेश ...
दिनांक १५ ऑगस्ट ,२०२१ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात ,जल्लोषात ,आकर्षक सजावट व आनंदाने साजरा केला.
आपल्या देशाचे म्हारळ गावात स्थायिक असलेले तीन वर्षे जम्मू - काश्मीर व सद्या गुजरात येथे सिमेवर काम करत असलेले नौजवान साईंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ही बाब मानिवली गाव तसेच शाळा यांच्यासाठी अतिशय अभिमानाची आहे. .
यावेळी पवार साहेब यांची विशेष मुलाखत घेऊन त्यांच्याद्वारे समस्त देशबांधवांना देशासाठी सत्कर्म करण्याची जिद्द ,चिकाटी ,मेहनत ,ठाम निश्चय हा संदेश पोहचविण्यात आला. तसेच जास्तीत जास्त नौजवान आपल्या गावातून घडावेत तयार व्हावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले. ही विशेष मुलाखत सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी ठरली. पत्राद्वारे देशातील नौजवनापर्यंत राखी पोहचवली जाते आज मात्र आमच्या शाळेतील ,गावातील महिला वर्गांनी आपल्या देशाच्या या योध्याला (भावाला) राखी बांधण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आजचा अविस्मरणीय असा हा स्वातंत्र्य दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिं द्वारे आपल्या देशाचे नौजवान ,उपस्थित मान्यवर ,सरपंच ,उपसरपंच , ग्रा.पं.सदस्य ,पोलीस पाटील ,ग्रामस्थ ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य ,शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ,अंगणवाडी ताई मदतनीस , इतर सर्व उपस्थितांच्या समवेत झाला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. 🙏🙏🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शिक्षक वृंद मानिवली
🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment